यौवन हा आयुष्यातील आत्यंतीक महत्त्वाचा काळ , कळ्यांनी फुलण्याचा, पाखरांनी उडण्याचा, वेलींनी पसरण्याचा काळ म्हणजे यौवन ,सुवर्ण क्षणांचा संच म्हणजे यौवन, जीवनातील वसंत म्हणजे यौवन , मोठी स्वप्नं बघण्याचा त्या स्वप्नपुर्तीसाठी चालणार्या संघर्षाचा काळ �म्हणजे यौवन आणि असाच यौवनाने भरलेला तरूण देश म्हणजेच आपला भारत देश ....
एवढे तरूण असुनही अजून आपण मागे का? प्रत्येकाने विचार करायलाच हवा. आयुष्यातील हा वसंत असुनही आमचं तारूण्य वाया चाललंय ते पाश्चिमात्यांच्या अनुकरणात जीथे प्रेमाच्या नावाखाली व्याभीचाराचा बाजार थाटलेला आहे.
ज्या स्वप्नांसाठी आपण जगावं ,जी उम्मेद आपल्यात असावी ती सोडून फक्त घराच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं यालाच आपले यश मानणारी पिढी उदयास येतेय म्हणून भिती वाटते , शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मावळे सुध्दा दुसऱ्यांकडे चाकरीसाठी लाचारी पत्करतायेत म्हणून भिती वाटते, जींकणं शिकवणार्या कृष्णाला मानणारी लोकं हरण्याची नि मरणाची भाषा करत आहोत म्हणुन भिती वाटते ,ज्यांच्या भरवशावर डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलामांनी भारताला महासत्ता बनवण्याचे स्वप्न बघीतले ती पिढी व्यसनाधीन बनतेय म्हणुन भिती वाटते आणि भिती वाटते कारण तरूण आज स्वतःची अोळखच विसरून बसलाय !!!

आठवा आपण कुणाचे वंशज आहेात?
गणिताला गती देणारे आर्यभट्ट, अणुचा शोध लावणारे महर्षी कणाद,धर्म अध्यात्म सांगणारे संत, शिक्षणाचे महत्व वाढवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुढील पिढ्या अश्या� षंढ निघाव्यात ?
मुळीच शक्य नाही हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे ......

©
------स्वलिखीत -------
प्रा. प्रदीप वराडे ( प्रदीप्त )
(इन्फिनीटी क्लासेस ,अौरंगाबाद)
7588075845
------स्वलिखीत -------
प्रा. प्रदीप वराडे ( प्रदीप्त )
(इन्फिनीटी क्लासेस ,अौरंगाबाद)
7588075845
Comments
Post a Comment